माढा तालुक्यात कोरोनाग्रस्तांसाठी ८०० बेडची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:04+5:302021-05-13T04:23:04+5:30

कुर्डूवाडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बाधितांच्या सोयीसाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून विविध ...

800 beds for corona victims in Madha taluka | माढा तालुक्यात कोरोनाग्रस्तांसाठी ८०० बेडची सोय

माढा तालुक्यात कोरोनाग्रस्तांसाठी ८०० बेडची सोय

Next

कुर्डूवाडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बाधितांच्या सोयीसाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून विविध ठिकाणी ८०० बेडची व्यवस्था केली आहे. लवकरच आणखी २०० बेडची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये माढा मतदारसंघातील कोरोनाबाबत सद्यस्थितीवर रणजितसिंह यांनी आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिंदे, प्रशासन अधिकारी सयाजी बागल उपस्थित होते.

रणजितसिंह शिंदे पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात सर्वाधिक कोव्हिड सेंटर माढा तालुक्यात आहेत. रुग्णांना स्वत:च्या भागात उपचार घेता यावेत म्हणून १० ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये सध्या ६०० बेडची व्यवस्था केली आहेत. पंढरपूर तालुक्यात करकंब येथे १०० बेडची व माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे ११० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

माढा तालुक्यात १३६ ऑक्सिजन बेड, माढा तालुक्यातील रांझणी येथे १५० बेडचे कोव्हिड सेंटर व पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथे ५० बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होणार आहे. माढा येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. तेथे आणखी ३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून तसेच शासनाचा आरोग्य विभाग आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उपयुक्त साहित्य,गोळ्या औषधे, इंजेक्शन पुरविण्यात येत आहेत.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी १५ लाख रुपये किमतीच्या २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनी दिलेल्या आहेत. लवकरच आमदार फंडातून प्रत्येकी पावणेदोन लाख रुपये किमतीच्या १० बायपॉप मशीन शासकीय कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी देणार आहे.आजपर्यंत आमदार बबनराव शिंदे व आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून शासनाकडून माढा तालुक्याला ६७२ रेमडिसिवीर इंजेक्शन मिळाले असून आणखी प्रयत्न सुरू आहेत.

.......

माढा तालुक्यात १३६ ऑक्सिजन बेड

कोरोनाग्रस्तांना वाचविण्यासाठी माढा तालुक्यात १३६ ऑक्सिजन बेड व १८ व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे २० ऑक्सिजन बेडयुक्त कोव्हिड सेंटर सुरू झाले आहे. लवकरच आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक,पंढरपूर तालुक्यातील तुंगत व माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे प्रत्येकी १० ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होणार आहे.

----

फोटो : रणजितसिंह शिंदे

Web Title: 800 beds for corona victims in Madha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.