प्रधानमंत्री आवास योजनेेसाठी करमाळा नगरपालिकेकडे ८१ जणांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:07+5:302020-12-26T04:18:07+5:30

करमाळा : शासनाची प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजना आणली आहे. या योजनेतून शासन अनेक कुटुंबांना स्थिर करण्याचा प्रयत्न ...

81 applications for Pradhan Mantri Awas Yojana from Karmala Municipality | प्रधानमंत्री आवास योजनेेसाठी करमाळा नगरपालिकेकडे ८१ जणांचे अर्ज

प्रधानमंत्री आवास योजनेेसाठी करमाळा नगरपालिकेकडे ८१ जणांचे अर्ज

googlenewsNext

करमाळा : शासनाची प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजना आणली आहे. या योजनेतून शासन अनेक कुटुंबांना स्थिर करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. करमाळ्यात ३१७ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच यंदा ८१ जणांनी घरकुलासाठी नोंद केली असून, त्यांची यादी नगरपालिकेला प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली.

शासनाच्या सामान्य नागरिकांच्या हिताच्या विविध योजना तळा-गळातल्या गोरगरीब जनतेसाठीच आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सामान्य नागरिक हा शहर विकासाचा केंद्रबिंदू मानला गेला आहे. अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांपर्यंतचा लाभ शहरातील जनतेला झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची पार्श्वभूमीवर निधी वाटपासंदर्भात शासनावर मर्यादा आल्या आहेत. या अडचणीच्या काळात विविध योजनांसाठी शासन दरबारी मागणी करून निधी खेचून आणल्याचे जगताप यांनी सांगितले.

Web Title: 81 applications for Pradhan Mantri Awas Yojana from Karmala Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.