सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:51 PM2018-06-13T12:51:23+5:302018-06-13T12:51:23+5:30

82 crore of Solapur Transport and Education Board's 36 crores budget approved | सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर

सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर

Next
ठळक मुद्देमहापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची अर्थसंकल्पीय सभाशिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर

सोलापूर : महापालिका परिवहन समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकात २ कोटींनी वाढ करून सभागृहाने ८२ कोटी ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेच्या सभेत एकमताने मंजूर केले. त्याचबरोबर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ व बिगर प्राथमिक शिक्षण मंडळात प्रशासनाने सुचविलेल्या अंदाजामध्ये दोन कोटींनी वाढ करून ३६ कोटी ७५ लाखांचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. 

महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा झाली. या सभेत महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांनी ८० कोटी ४२ लाख ५१ हजार ६०६ रुपयांचे अंदाजपत्रक सभेत सादर केले. यानंतर सभागृहनेते संजय कोळी यांनी सूचनेत परिवहन समितीने सुचविलेल्या अंदाजात वाढ सुचवत ८२ कोटींचे अंदाजपत्रक मांडले.

याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी कर्मचाºयांना नवीन बसचे ज्ञान द्यावे, बसची संख्या वाढवून चांगली सेवा द्यावी. शासनाकडून व्यवस्थापक मिळविण्यासाठी १०० मार्ग असणे आवश्यक आहेत, परिवहनकडे ९६ मार्ग आहेत, आणखी मार्ग वाढविण्याचे प्रयत्न व्हावेत, अशा सूचना केल्या. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दर बसमागे ५ ते ७ कर्मचाराी असावेत, पण परिवहनकडे २० कर्मचारी आहेत. ही संख्या घटवून चांगले नियोजन करण्यासाठी व्यवस्थापक नियुक्त करावा, अशी मागणी केली. 

आयुक्तांनी पाठविलेल्या बिगर प्राथमिक शिक्षण मंडळाची सूचना सभागृहनेते संजय कोळी यांनी मांडली. प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाने ३२ कोटी ७५ लाख १० हजारांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात काहीच बदल केलेला नाही. बिगर प्राथमिक शिक्षण खात्याच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने सुचविलेल्या क्रीडा महोत्सवाच्या खर्चात १ ऐवजी ४ लाखांची तरतूद मान्य केली. चर्चेविनाच पाच मिनिटात परिवहन व शिक्षण मंडळाचे बजेट एकमताने मंजूर करण्यात आले.

चर्चेविना अंदाजपत्रक मंजूर
- परिवहन समिती व प्राथमिक शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर करण्यात आले.
- महापालिकेच्या अंदाजपत्रकावर उमरखान बेरीया, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, देवेंद्र कोठे, महेश कोठे, चेतन नरोटे, नागेश वल्याळ, नारायण बनसोडे, सुनीता रोटे, कामिनी आडम, श्रीदेवी फुलारे, गणेश पुजारी, गुरुशांत धुत्तरगावकर, ज्योती बमगुंडे, रियाज खैरादी, तौफीक शेख, राजकुमार हंचाटे यांची भाषणे झाली.

Web Title: 82 crore of Solapur Transport and Education Board's 36 crores budget approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.