सोलापूर अन् उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८२७ कोटींचा निधी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:19 PM2021-02-13T13:19:02+5:302021-02-13T13:19:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

827 crore distributed to affected farmers in Solapur and Osmanabad | सोलापूर अन् उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८२७ कोटींचा निधी वितरित

सोलापूर अन् उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८२७ कोटींचा निधी वितरित

googlenewsNext

सोलापूर : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त स्थितीमुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्याची नुकसान भरपाई म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूर जिल्हासाठी 545 कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 282 कोटींचा निधी वितरित केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. 

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे  शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याबाबत चौथ्या अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी या दोन्ही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती.

त्यानंतर आमदार देशमुख यांनी वारंवार यासाठी वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ना. विजय वडेट्टीवार यांनी आतापर्यंत राज्यात चार हजार 4489 कोटीचा निधी वितरित करण्यात आला असून यात सोलापूर जिल्ह्यासाठी 545 कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 282 कोटी चा निधी वितरित केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांना पत्राद्वारे दिली आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी दिल्याबद्दल आमदार देशमुख यांनी वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.

Web Title: 827 crore distributed to affected farmers in Solapur and Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.