सोलापुरातून गायब झालेल्या ८५ जणांचा आठ दिवसात खाकीकडून लावला छडा

By विलास जळकोटकर | Published: April 11, 2024 06:40 PM2024-04-11T18:40:36+5:302024-04-11T18:41:15+5:30

आठ दिवसात ८५ जणाचा छडा लावण्यात खाकीला यश आले. यामध्ये ४३ महिला, ३६ पुरुष आणि सहा बालकांचा समावेश आहे.

85 people who disappeared from Solapur were traced by police in eight days | सोलापुरातून गायब झालेल्या ८५ जणांचा आठ दिवसात खाकीकडून लावला छडा

सोलापुरातून गायब झालेल्या ८५ जणांचा आठ दिवसात खाकीकडून लावला छडा

सोलापूर: शहरातून गायब होणे, फूस लावून पळवून नेणे अशा प्रकारामध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवण्यात आली. आठ दिवसात ८५ जणाचा छडा लावण्यात खाकीला यश आले. यामध्ये ४३ महिला, ३६ पुरुष आणि सहा बालकांचा समावेश आहे.
गायब होणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सात पोलीस ठाणे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अशा आठ पथकांद्वारे १ ते ८ एप्रिल या आठ दिवसात विशेष मोहिम राबवली. सातही पथकाकडून ८५ जणांचा शोध लावण्यात आला.

गायब झालेल्या या सर्वांना त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नातलगांना बोलावून घेऊन त्यांच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. गायब व्यक्ती पोलिसांच्या मदतीने पुन्हा स्वगृही आल्याने नातलगांनी पोलिसातील माणुसकीबद्दल आभार मानले. पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यांचे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अंमलदारांनी ही कामगिरी केली.

पोलीस ठाणेनिहाय शोध
फौजदार चावडी : ०९
जेलरोड : ०४
सदर बझार : ०५
विजापूर नाका : ०६
सलगर वस्ती : ०२
एमआयडीसी : १४
जोडभावी : १४
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष : ३१
एकूण : ८५

चार महिन्यात ५७८ जणांचा शोध
डिसेंबर २०२३ ते ८ एप्रिल या चार महिन्यामध्ये सातही पोलीस ठाण्याचे पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अशा आठ पथकाने राबवलेल्ळा मोहिमेत एकूण ५७८ गायब व्यक्तींचा शोध लावण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: 85 people who disappeared from Solapur were traced by police in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.