८५ वर्षीय आजीबाईंना करायचाय गावाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:16 AM2021-01-10T04:16:40+5:302021-01-10T04:16:40+5:30
पंढरपूर तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये जवळपास १५५० मतदान असलेल्या देवडे (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीचा समावेश ...
पंढरपूर तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये जवळपास १५५० मतदान असलेल्या देवडे (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीचा समावेश आहे. येथील कलावती शिंदे यांच्या घरात कायम राजकीय पार्श्वभूमी, प्रत्येकवेळी त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा घडायच्या. पण नाव मागे पडायचे. त्यामुळे निवडणूक लढविण्याची इच्छा अपुरीच राहत असल्याचे कलावती शिंदे यांनी सांगितले.
या ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रभाग क्र. २ मधून त्यांच्या सूनबाईंसह त्यांचा पूरक म्हणून अर्ज भरला होता. दोन्हीपैकी एक अर्ज माघारी घेण्याचे निश्चित होते. मात्र अर्ज भरल्यानंतर पुन्हा गावातील परिचारक गट, भावभावकीची बैठक बसली आणि त्या वेळी कुणाचा अर्ज ठेवायचा याबाबत चर्चा सुरू होती. या वेळी कलावती शिंदे यांनी यावेळी माझ्या नावाचा विचार व्हावा, असा प्रस्ताव मांडला आणि भावभावकी, पाहुण्या-रावळ्यांसह गटानेही त्या नावास संमती दिली म्हणून मी निवडणुकीत उभी असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फोटो :
०९कलावती शिंदे