८५५ कोटीचा जिल्हा नियोजन आराखडा सादर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'डीपीसी' ची बैठक सुरू
By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 28, 2023 02:04 PM2023-12-28T14:04:00+5:302023-12-28T14:04:17+5:30
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली असून यात 2024- 25 करिता ८५५ कोटीचा नियोजन आराखडा सादर करण्यात आला आहे.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली असून यात 2024- 25 करिता ८५५ कोटीचा नियोजन आराखडा सादर करण्यात आला आहे. येथील नियोजन भवनात बैठक सुरू आहे.
यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आव्हाळे, महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली-उगले, आमदार सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, दीपक साळुंखे-पाटील, आ.समाधान अवताडे, आ. प्रशांत परिचारक, नारायण पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.