सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी ८.७६ कोटी खेळते भांडवल, राजेंद्र भारुड यांची माहिती, महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:34 PM2018-02-14T12:34:59+5:302018-02-14T12:37:00+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी मंगळवारी येथील कार्यक्रमात दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महिला स्वयंसहायता गटाने तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन ‘रुक्मिणी जत्रे’चे मंगळवारी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांच्या हस्ते होम मैदानावर उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित महिलांना उद्देशून डॉ. भारुड बोलत होते. यावेळी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन नकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, नाबार्डचे प्रदीप झिले, लीड बँकेचे श्रीराम, त्रिवेणी भोंदे उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी ३० स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्या स्टॉलची पाहणी पदाधिकारी व अधिकाºयांनी केली.
सभापती देशमुख म्हणाल्या, आजची स्त्री निर्भीड झाली आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. शासनाच्या विविध योजना ‘उमेदह्णच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सभापती पाटील यांनी भाषणातून ग्रामीण भागातील महिलांनी जिद्द व चिकाटी सोडू नये. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा उपस्थितांना दिला.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आॅनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे नवाळे यांनी स्पष्ट केले. यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.