उत्तर तालुक्यात आठ दिवसात ८८ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:34+5:302021-04-09T04:23:34+5:30
उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने एप्रिल महिन्याच्या आठ दिवसांत तब्बल ८८ रुग्णांची ...
उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने एप्रिल महिन्याच्या आठ दिवसांत तब्बल ८८ रुग्णांची भर पडली आहे. यात प्रामुख्याने कळमण, वडाळा, रानमसले, बीबीदारफळ व कौठाळी गावात रुग्ण वाढत आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यात १ एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९२६ इतकी होती, ती ८ एप्रिल रोजी १,०१४ इतकी झाली आहे. म्हणजेच आठ दिवसात ८८ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील चार आरोग्य केंद्रांपैकी कळमण आरोग्य केंद्रात सर्वाधिक ४६ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये कौठाळीत १३, कळमणमध्ये ११, वडाळ्यात १० तसेच बीबीदारफळ व रानमसले येथे प्रत्येकी पाच रुग्णांची भर पडली आहे. मार्डी आरोग्य केंद्रांतर्गत गावांत ५, कोंडी आरोग्य केंद्रांतर्गत गावांत १८ व तिर्हे आरोग्य केंद्रांतर्गत गावांत १९ रुग्ण आढळले आहेत. तिर्हे येथे एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे तालुक्यात एकूण ४१ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.
बीडीओ, कक्ष अधिकारी बाधित
उत्तर तालुक्याच्या गटविकास अधिकारी जस्मीन शेख या मागील गुरुवारपासून कार्यालयात आल्या नाहीत. बुधवारी त्यांनी पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा परिषदेला कळवले. गटविकास अधिकारी शेख व कक्ष अधिकारी एन. व्ही. ओतारी हे पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य अधिकारी डाॅ. श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.