बार्शी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी ९ कोटींचा निधी मंजूर : राजेंद्र राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:36+5:302021-07-16T04:16:36+5:30
यामध्ये उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम, उपकरणे, यंत्रसामग्री, वीज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे. हा निधी आशिया विकास बँकेकडून ७० ...
यामध्ये उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम, उपकरणे, यंत्रसामग्री, वीज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे. हा निधी आशिया विकास बँकेकडून ७० टक्के, तर राज्य शासनाकडून ३० टक्के इतका मंजूर करण्यात आलेला आहे. तालुक्यातील या ८ आरोग्य उपकेंद्रांना मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त असून, या अंदाज व आराखड्यामध्ये मुख्य इमारत, निवासस्थान, फर्निचर, साहित्यसामग्री, वीज-पाणी, कंपाैंड, अंतर्गत रस्ते या सर्व बाबींचा समावेश असावा असे नमूद केलेले आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, माजी जि. प. सदस्य संतोष निंबाळकर, जि. प. सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, इंद्रजित चिकणे, राजाभाऊ धोत्रे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.
---