सोलापूर जिल्ह्यात ९ लाख २० हजार वृक्षांची लागवड
By admin | Published: July 13, 2017 02:41 PM2017-07-13T14:41:15+5:302017-07-13T14:41:15+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : राज्य शासनाच्या वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात ९ लाख २० हजार ४०२ वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्ह्याच्या उद्दिष्टाच्या १८४.८ टक्के वृक्ष लागवड झाली असल्याची माहिती उपवनसंरक्षक संजय माळी यांनी दिली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७४ हजार ७५५ वृक्ष लागवड करुन अन्य विभागापेक्षा आघाडीवर आहे.
सोलापूर जिल्ह्याला पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्ह्यात ९ लाख ३४ हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र त्यापैकी ९ लाख २० हजार ४०२ वृक्ष लावण्यात विविध शासकीय कार्यालयांना शक्य झाले आहे. यामध्ये सर्वाधिक वृक्षारोपण जिल्हा परिषद कार्यालयाकडून करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने ३ लाख ७४ हजार ७५५ वृक्षारोपण केले आहे. त्यापाठोपाठ उपवनसंरक्षक कार्यालयाने ३ लाख ३८ हजार १०० वृक्षारोपण करुन दुसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत पुढील वर्षी राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक माळी यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांना उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये उपवनसंरक्षक वनविभागास ३,२६,९९० उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी ३,३८,१०० वृक्षांची लागवड केली. विभागीय वन अधिकारी कार्यालयाने १ लाख ८ हजार ३०० लागवड केली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ५६ हजार ९५, सोलापूर महापालिकेने ६ हजार ४१६, कार्यकारी अभियंता, सा.बां.वि, सोलापूर - १९९५, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर- ५२०, जि.प. शिक्षण अधिकारी माध्यमिक/प्राथमिक - १० हजार २४०, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर- ४००, पोलीस आयुक्त, सोलापूर- १०५०, पोलीस अधीक्षक, सोलापूर १२१७, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग- १ हजार, जिल्हा आरोग्य विभाग, सोलापूर - ३ हजार ४०९, अधीक्षक अभियंता शहरी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, सोलापूर- १ हजार, जिल्हा उत्पादन शुल्क विभाग- ५००, मध्यवर्ती कारागृह, सोलापूर- ५०, भूजल व सर्व्हेक्षण विभाग, सोलापूर- १००, कोषागार अधिकारी, कार्यालय- १००, परिवहन विभाग- १०७५, जिल्हाधिकारी कार्यालय- ३ हजार, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग- ३१०, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, सोलापूर- ५००, जिल्हा परिषद ३ लाख ७४ हजार ७५५, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण- १७८०, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय- २ हजार, एम.आय.डी.सी. चिंचोळी- २ हजार, वन्यजीव विभाग नान्नज/करमाळा- १ हजार, वैयक्तिक १०२ अशा विविध शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.
---------------------------
विविध विभागांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
च्शासनाने यंदा महाराष्ट्रात ४ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये सोलापूर जिल्हा परिषद आणि उपवनसंरक्षण विभागाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकावर आघाडी घेतली असताना त्या खालोखाल विभागीय वन अधिकारी कार्यालयाने तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने ५६ हजार वृक्षांची लागवड करुन उद्दिष्टपूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने उद्दिष्टाहून अधिक वृक्ष लागवड केली.