टायर फु टल्याने बोंडले जवळ बस पलटी ९ प्रवासी जखमी
By admin | Published: May 20, 2014 01:15 AM2014-05-20T01:15:07+5:302014-05-20T01:15:07+5:30
: वळणावर उलटल्याने नुकसान
बोंडले : बसचे पुढील टायर फु टल्यामुळे पंढरपूरहून स्वारगेट (पुणे) येथे निघालेली बस बोंडले (ता. माळशिरस) येथे वळणामध्ये सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पलटी झाली. यामध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. पंढरपूरहून स्वारगेटकडे निघालेली बस (क्र. एम. एच. १४ बी. टी. 0४६८) पहाटे अचानक बोंडले गावाजवळील वळणावर पलटी होऊन शेजारील शेतामध्ये जाऊन पडली. पलटी झालेल्या बसच्या काचा फुटून प्रवासी बाहेर निघाले. या अपघातामध्ये देविदास वामन शितापे (भूम), वाल्मिक विठोबा माने, सिध्देश्वर गुंडा माने (बामणी), अशोक सुधाकर रत्नपारखी (पंढरपूर), नरेंद्र बापूराव जव्हेरी (मावळ), आबासाहेब नामदेव वाकळे (आंबेगाव), गजानन आत्माराम सोनटे (बुलढाणा), बाळासाहेब हनुमंत रूपनर व शंकर रामा डुबल (पंढरपूर) हे ९ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी वेळापूर येथील शिवम हॉस्पिटल, अकलूज येथील राणे हॉस्पिटल व पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या अपघाताबाबत बस ड्रायव्हरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, बसचे पुढील टायर अचानक फुटल्यामुळे त्यातील हवा निघून गेली. उतारावर असलेली बस चाकातील हवा निघून गेल्यामुळे अनियंत्रित झाली व शेजारील शेतात जाऊन पलटी झाली. पहाटे झालेल्या या अपघाताच्या आवाजाने रस्त्यावरील प्रवाशांनी व गावातील नागरिकांनी प्रवाशांना बाहेर निघण्यास मदत केली. तपास पो. हे. काँ. क्षीरसागर करीत आहेत़