सोलापुरात ९ पॉझीटिव्ह तर ग्रामीणमधील ६७ 'कोरोना' बाधित निगेटिव्ह...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 07:36 PM2020-05-01T19:36:34+5:302020-05-01T20:46:10+5:30
'कोरोना' रुग्णांची संख्या झाली १११; शास्त्रीनगरातील एकाच घरातील छोट्या भाऊ बहिणीला लागण
सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी नव्याने ९ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या १११ इतकी झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये शास्त्रीनगरातील चारजण असून, छोट्या भाऊ व बहिणीलाही बाधा झाल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातून म्हणजेच अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव व पंढरपुरातील ६७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सोलापूर शहरात जुन्याच हॉटस्पॉटमध्ये आठ रुग्ण आढळले आहेत. तर बाळे येथील संतोषनगरातील एका नर्सला कोरोणाची बाधा झाल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. त्रास होऊ लागल्याने २८ एप्रिल रोजी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान स्वॅब घेण्यात आल्यावर अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. शास्त्रीनगरात पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना केगाव येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यातील चौघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यामध्ये शानदार चौकातील एक १३ वर्षाची मुलगी व तिचा ११ वर्षाचा भाऊ आणि ३0 वर्षाच्या व्यक्तीला लागण झाली आहे. तसेच ताई चौकाील रवींद्रनगरात राहणाºया ५१ वर्षाची महिला, २५ वर्षाचा तरुण, न्यू पाच्छापेठेतील २८ वर्षाच्या महिलेस 'कोरोना'ची लागण झाली आहे.
राहुलगांधी झोपडपट्टीतील एका ६0 वर्षाच्या वृद्धेस सारीची लक्षणे आढळली म्हणून उपचारास दाखल केल्यावर अहवाल 'कोरोना' पॉझीटीव्ह आला आहे.
अशा प्रकारे 'कोरोना' पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १११ झाली आहे. यातील सहाजण मरण पावले आहेत, तर उपचारानंतर बरे झालेले गुरूवारी ३ आणि शुक्रवारी ७ जणांना सोडण्यात आले. यामुळे आता रुग्णालयात उपचार घेणाºयांची संख्या ९५ इतकी आहे.
ग्रामीणमधील लोकांना दिलासा
यापूर्वी चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व पाटकुलच्या महिलेच्या संपर्कात आलेल्या पंढरपुरातील अनेकांना इन्स्टिट्युट क्वारंटाईन करण्यात आले आहे. या लोकांचे अहवाल काय येतात याबाबत सर्वांचा उत्सुकता होती. चपळगावच्या २0 तर पंढरपूरच्या ४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
शुक्रवारचे असे आहेत रुग्ण
ताई चौक:२
न्यू पाच्छापेठ: १
राहुलगांधी झोपडपट्टी: १
संतोषनगर, बाळे: १
शास्त्रीनगर: ४