सोलापुरातील ९० टक्के नागरिक ‘कागदोपत्री’ अविवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:55+5:302020-12-05T04:41:55+5:30

२००० सालानंतर विवाह नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पण विवाह नोंदणी बाबत अद्याप जागरूकता नाही. फक्त अडचणीच्या वेळी ...

90% of the citizens of Solapur are unmarried | सोलापुरातील ९० टक्के नागरिक ‘कागदोपत्री’ अविवाहित

सोलापुरातील ९० टक्के नागरिक ‘कागदोपत्री’ अविवाहित

Next

२००० सालानंतर विवाह नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पण विवाह नोंदणी बाबत अद्याप जागरूकता नाही. फक्त अडचणीच्या वेळी किंवा गरज निर्माण झाल्यानंतर नागरिक विवाह नोंदणी करता विभागीय कार्यालयाकडे धाव घेतात.

चालू वर्षात आठ विभागीय कार्यालयाकडून ८१९ विवाह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

..................

सोलापूर शहराची एकूण लोकसंख्या

९ लाख ५१ हजार ८५८

पुरुष : ४ लाख ८१ हजार ६४

स्त्री - ४ लाख ३० हजार ४९४

(२०११ च्या जनगणनेनुसार)

.............

जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली नोंदणी

८१९

..........

चौकट

नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी

विवाह नोंदणीकरिता माहिती घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. बहुतांश लोकांकडून कागदपत्रांची पूर्तता होत नाही. विवाह नोंदणीकरिता तीन साक्षीदार, एक पुरोहित, वधू-वरांचे आधारकार्ड, पत्ता पुरावा, विवाह कार्ड, विवाह फोटो, सर्वांचे आयडी साईज फोटोज यासह विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. सहीकरिता सर्वांना विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात मराठी किंवा इंग्रजी भाषेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जातो. बहुतांश लोक कागदपत्रांच्या अभावामुळे विवाह नोंदणी करता अपात्र ठरतात.

.........

कोट

विवाह नोंदणीकरिता येणाऱ्या अर्जांची संख्या प्रतिमहिना दहा ते बारा इतकीच आहे. आम्ही लोकांना नोंदणीकरिता आवाहन करतो. आलेल्या नवविवाहितांना किंवा त्यांच्या पालकांना विवाह नोंदणी बाबत प्रबोधन करतो. आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करतो. बहुतांश लोक माहिती विचारून जातात. पुन्हा कार्यालयाकडे फिरकत नाहीत. विवाह नोंदणीकरिता सुशिक्षित लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

तेजस्विता कासार

सहायक विवाह निबंधक

विभागीय कार्यालय-८

..........

Web Title: 90% of the citizens of Solapur are unmarried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.