coronavirus; महाराष्ट्रातील ९५ भाविक अडकले उत्तर प्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:03 PM2020-03-28T12:03:54+5:302020-03-28T12:06:17+5:30
सोशल मीडियावर मागितली मदत; अखंड हरिनाम सप्ताहासाठी गेले होते वारकरी
सचिन कांबळे
पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गजन्य रोगापासून देशातील नागरिकांचा बचाव होण्यासाठी सबंध देश लॉकडाउन केला आहे. यामुळे अखंड हरिनाम सप्ताहासाठी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमधील श्री क्षेत्र वृंदावन येथे गेलेल्या महाराजांसह ९५ भाविक अडकून पडले आहेत.
पंढरपूर येथील श्रीसंत ज्ञानोबाराय पालखी सोहळ्यातील मानाचे दिंडीप्रमुख व पंढरपूर येथील रहिवासी ह.भ.प. शाम महाराज ननवरे (उखळीकर) हे श्री तीर्थक्षेत्र वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे त्यांचे शिष्य परिवारासह (९५ लोक) अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचे परतीचे रेल्वे आरक्षणही होते. मात्र, सध्या देशभरात कोरोना (कोविड-१९) च्या अनुषंगाने लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. परराज्यात असल्याने व परत येण्याची कोणतीही सोय उपलब्ध होत नाही. त्यांच्या सोबत असलेल्या वयस्कर व्यक्ती, स्त्रिया घाबरून गेल्या आहेत.
या अचानक घडलेल्या गोष्टींमुळे बºयाच जणांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवत आहे. असे असले तरी त्यांना महाराष्ट्रातील विविध नेतेमंडळींनी धान्यपुरवठा केला आहे. मात्र, तेथे अडकलेल्या सर्व भाविकांनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र शासनाने आम्हाला महाराष्ट्रात येण्याची सोय करावी, अशी मदत मागितली आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्री. देवव्रत (राणा) महाराज वासकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे, विधान परिषद सभापती नीलम गोºहे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
उत्तर प्रदेशमधून आपल्या गावी परत पाठवावे म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. ते याबाबत सकारात्मक आहेत.
- ह.भ.प. शाम महाराज ननवरे (उखळीकर), पंढरपूर