सोलापूरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करत ९० हजार रूपयांची फसवणूक
By रूपेश हेळवे | Published: December 14, 2022 03:37 PM2022-12-14T15:37:00+5:302022-12-14T15:37:33+5:30
चिटमपल्ली हे अशोक चौक येथील एटीएम मधून पैसे काढत होते. त्यावेळी त्याच्या पाठीमागील तरूणाने त्यांना बॅकेचे स्टेटमेंट काढण्यास सांगितले.
सोलापूर - एटीएम कार्डची अदलाबदल करत खात्यातून ९० हजार रूपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नवनाथ सुग्रवी चिट्टमपल्ली ( वय ४२, रा. कोटा नगर, जुना विडी घरकूल) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी चिटमपल्ली हे अशोक चौक येथील एटीएम मधून पैसे काढत होते. त्यावेळी त्याच्या पाठीमागील तरूणाने त्यांना बॅकेचे स्टेटमेंट काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने फिर्यादीचा परवलीचा शब्द पाहिला. दरम्यान त्याने हातचलाखी करत एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर चिटमपल्ली यांच्या खात्यातून ९० हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी घडली. या घटनेवरून तरूणावर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोसई बादोले करत आहेत.