बार्शी तालुक्याला ९०२ घरकुले मंजूर; प्रत्येकी दीड लाख रुपये अनुदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:07+5:302020-12-12T04:38:07+5:30
बार्शी तालुक्यात १३८ गावे व वाड्या-वस्त्या आहेत, त्यामध्ये एकूण १५०५ लाभार्थी होते. त्यापैकी १५ गावांतील पात्र ५७२ लाभार्थी संख्या ...
बार्शी तालुक्यात १३८ गावे व वाड्या-वस्त्या आहेत, त्यामध्ये एकूण १५०५ लाभार्थी होते. त्यापैकी १५ गावांतील पात्र ५७२ लाभार्थी संख्या ही मागील दोन वर्षात संपली आहे. त्यानंतर तालुक्यात ८७३ लाभार्थी राहिले होते. त्यापैकी सर्वसाधारण लाभार्थींना ८६७, अनुसूचित जाती ३२, तर अनुसूचित जमाती ३ अशा ९०२ लाभार्थींचा समावेश आहे. या लाभार्थींना घरकुलाच्या कामासाठी एक लाख २० हजार, शौचालयासाठी १२ हजार आणि रोहयोमधून १८ हजार याप्रमाणे एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार असल्याचेही सभापती डिसले यांनी सांगितले.
घरकुले मंजूर झालेल्या लाभार्थींनी तात्काळ करारनामे करून कामाला सुरुवात करावी, असे आवाहन डिसले यांनी केले आहे. यावेळी प्रमोद वाघमोडे, झेडपी सदस्य श्रीमंत थोरात, अविनाश मांजरे, इंद्रजित चिकणे, राजाभाऊ धोत्रे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे आदी उपस्थित होते.
गावनिहाय घरकुलांची यादी
लमाणतांडा-तांबेवाडी, शेळगाव ९७ घरकुले मंजूर झाली आहेत. त्याखालोखाल शेळगाव आर ६०, वैराग ५१, पिंपळगाव पान ३३, कोरफळे २९, मुंगशी वा. २५, तर खालील गावांना प्रत्येकी पानगाव, रातंजन-२४, उपळेदुमाला, मालेगाव-२३, चुंब-२२, राळेरास-१९, कळंबवाडी-१६, नारी, नारीवाडी, सासुरे १५, शेंद्री, मालवंडी, साकत १४, महागाव, उंबर्गे, काटेगाव १३, पाथरी, तडवळे १२, इर्ले, रस्तापूर, गुळपोळी ११, खडकलगाव, वांगरवाडी, पांढरी ९ , गौडगाव, भानसळे, सुर्डी, लाडोळे ७, मानेगाव, सावरगाव, नांदणी, पिंपळगाव धस, चारे ६, काळेगाव, ममदापूर, पिंपळवाडी, बोरगाव झा, उक्कडगाव, भातंबरे, झरेगाव, भालगाव, शेलगाव मा., गोरमाळे, कापशी, सौंदरे ५, दहिटणे, धामगाव, घारी, इंदापूर, बावी व झाडी ४, श्रीपतपिंपरी, कासारवाडी, कारी, कांदलगाव, जहानपूर, ताडसौंदणे, घाणेगाव, हळदुगे, बोरगाव खु., आगळगाव ३, धामणगाव, घोळवेवाडी, कव्हे, कळंबवाडी, खडकोणी, राऊळगाव, उंडेगाव, वालवड, संगमनेर, अलिपूर, येळंब, शिराळे, हत्तीज, सर्जापूर, सारोळे २, चिंचोली, मांडेगाव, मुगशी आर, निंबळक, पिंपरी आर, बळेवाडी, बाभूळगाव, भोइंजे, धानोरे, गाताचीवाडी, जामगाव आ., खांडवी, मिर्झनपूर, तुर्कपिंपरी, अरणगाव, बेलगाव व आंबेगाव या गावांना प्रत्येकी एक घरकुल मंजूर झाले आहे.