अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसांत ९२ रुग्ण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:21+5:302021-05-08T04:22:21+5:30
अक्कलकोट : तालुक्यात गुरुवारी तब्बल ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ...
अक्कलकोट : तालुक्यात गुरुवारी तब्बल ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार अंजली मरोड यांनी शुक्रवारपासून सात दिवस विविध गावांना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती करणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. याबरोबरच मृत्युदरही वाढला आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक काळजी घेताना दिसत नाहीत. तालुक्यातील ज्या गावामध्ये रुग्णसंख्या व मृत्यू अधिक त्या गावामध्ये ७ ते १३ मे या कालावधीत प्रत्यक्षात जाऊन स्थानिक समितीमार्फत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तहसीलदार अंजली मरोड यांच्या सोबत गटविकास अधिकारी महादेव कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांचे संयुक्त पथक दौरा करणार आहे.
मागील दोन दिवसांत अक्कलकोट शहरात म्हाडा कॉलनी-१, म्हेत्रेनगर-१, बुधवार पेठ-३ अक्कलकोट-३, स्वामी समर्थनगर-१, राम गल्ली-२, माळी गल्ली-१, खासबाग गल्ली-१, विजयनगर-१, माणिक पेठ-१, गुरुमित्रनगर-१, असे १८ तर ग्रामीण भागातील हंनुर-३, जेऊर-४, हंजगी-२, उडगी-१, बोरोटी बु-१, दोड्याळ-३, कुमठे-१, समर्थनगर-९, हैद्रा-१, वागदरी-३, किणी-१, चुंगी-२, आंदेवाडी-१, सलगर-२, नागणसुर-२, उमरगे-१, रुददेवाडी-१, अंकलगी-१, मंगरूळ-१, कडबगाव-१, कर्जाळ-१, दहिटणे-१, काझीकणबस-२, इब्राहिमपूर-१, तोळणूर-१, म्हैसलगी-१, बासलेगाव-१, दुधनी तांडा-१, केगाव बु-१, नागुरे-१, आळगी-१, गौडगाव बु-२, हत्तीकणबस-१, कोर्सेगाव-१, दर्शनाळ-१, करजगी-१, कडबगाव-१, सातन दुधनी-१, कुरनुर-१ असे एकूण ९२ कोरोनाबाधित रुग्ण दोन दिवसांत आढळून आले आहेत.
---
या गावांना देणार भेटी
८ मे : हैद्रा, शावळ, कोन्हाळी, कर्जाळ
९ मे : चुंगी, हंनुर, किणी,
१० मे : वागदरी, काझीकणबस, गोगाव, घोळसगाव, शिरवळ, बादोले,
१० मे : करजगी, मंगरूळ, तडवळ, सुलेजवळगे, रुददेवाडी, चिंचोळी(न)
१२ मे : मिरजगी, हालहळळी ह, चिक्केहळळी, मैंदर्गी, संगोळगी(ब), सलगर,
१३ मे : जेऊर, गळोरगी, बासलेगाव, कडबगाव