सोलापूर जिल्ह्यात ९२ टक्के बालकांना पोलिओची लस, छत्रपती सर्वाेपचार रुग्णालयात झाला मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:47 AM2018-01-29T11:47:23+5:302018-01-29T11:48:37+5:30
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी लसीकरण मोहिमेसंदर्भात बैठका घेऊन अधिकाºयांना मार्गदर्शन केले होते. या मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयात जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहायक संचालक डॉ. अभिमन्यू खरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर यांनीही बालकांना लस दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. मोहन शेगर आदी उपस्थित होते.
या मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरुन कुटुंब कल्याणचे सहायक संचालक डॉ. भीमाशंकर जमादार दौºयावर आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दूधभाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुलकर्णी, प्रशासन अधिकारी आरिफ सय्यद, साथरोग अधिकारी डॉ. राजीव कुलकर्णी, अनिलकुमार जन्याराम, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख आदींनी परिश्रम घेतले.
------------------------
तीन दिवस विशेष मोहीम
जिल्ह्यात ग्रामीण आणि नागरी भागात ५ वर्षांखालील एकूण ३,६२,४३६ बालके होती. ग्रामीण भागात एकूण २४१० आणि नागरी भागात २१० लसीकरण केंदे्र होती. ९७ मोबाईल टीम, १११ ट्रांझिट टीम स्थापनाही करण्यात आली होती. या माध्यमातून ३ लाख १९ हजार ८१६ बालकांना पोलिओची लस देण्यात आली. उर्वरित बालकांना ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८ या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी, वाडीवस्ती, ऊसतोड टोळी, वीटभट्टी आदी ठिकाणी जाऊन लस देण्यात येणार आहे.