९४१४ कोटींचा पतपुरवठा आराखडा; पीककर्ज, शेतीसाठीच्या कर्जाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:36 PM2020-06-08T16:36:55+5:302020-06-08T16:40:10+5:30
सोलापूर जिल्हा; शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व सर्वांसाठी घरे उपलब्ध होणार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ साठीच्या ९४१४.५७ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयास मंजुरी देण्यात आली. या आराखडयात पीक कर्ज आणि शेतीसाठीचे भांडवली कर्जाला प्राधान्य देण्यात आले असून या दोन्ही घटकांसाठी ६७४६.५८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक संतोष सोनवणे यांनी दिली.
सन २०२०-२१ आर्थिक वषार्साठीचा संभाव्य् पतपुरवठा आराखडा नाबार्डच्यावतीने तयार करण्यात आला. हा आराखडा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या आराखडयातील नियोजनानुसार बॅकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. या वेळी बॅक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, नाबाडार्चे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, आदी उपस्थित होते.
सोनवणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणे आणि सर्वासाठी घरे उपल्ब्ध करुन देणे या धोरणानुसार हा पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. आराखडयात शेती आणि शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात आले आहे.
पतपुरवठयातील नियोजन-
- पीक कर्ज- 4051.01 कोटी रुपये.
- शेतीसाठी भांडवली कर्ज- 2695.57 कोटी रुपये.
- लघु आणि मध्यम उदयोग- 1916.28 कोटी रुपये.
- शैक्षणिक कर्ज- 122.29 कोटी रुपये.
- गृह कर्ज- 507.55 कोटी रुपये.
- वैकल्पिक उर्जा उदयोग- 17.09 कोटी रुपये.
- सामाजिक विकास क्षेत्र- 86.33 कोटी रुपये.
- निर्यात उदयोग- 18.45 कोटी रुपये.