९६ साखर कारखान्यांंनी थकविली एफआरपी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:18 AM2024-04-15T10:18:52+5:302024-04-15T10:19:24+5:30
साखर कारखान्यांचे पट्टे पडून दोन महिन्यांचा कालावधी लोटला.
अरुण बारसकर
सोलापूर : साखर कारखान्यांचे पट्टे पडून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे अदा झाले नाहीत. राज्यातीत ९६ कारखान्यांनी १,८१४ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकविले आहेत.
६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची संख्या १५ आहे. ८० टक्क्यांपर्यंत एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले राज्यातील एकूण २९ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सोलापूर, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील, विठ्ठल कॉर्पोरेशन (म्हैसगाव), इंद्रेश्वर शुगर (बार्शी), भैरवनाथ (विहाळ), भैरवनाथ (आलेगाव), जय हिंद (आचेगाव), धाराशिव शुगर (सांगोला) या साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे समाेर आले आहे.
एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस देऊन सुनावणी घेतली आहे. पैसे देतो म्हणून मुदत मागून घेतात. मात्र, पैसे देत नाहीत. अशा कारखान्यांची आर.आर.सी. करण्यासाठी प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे. - पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक (साखर)