पंढरीत ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने वेधले लक्ष; जनजागृती रॅलीत ८ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:45 PM2022-08-10T17:45:03+5:302022-08-10T17:45:51+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी पंढरपुरातून रॅली काढण्यात आली. ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधले. भारत मातेच्या जयघोषाने पंढरीनगरी दुमदुमली. या रॅलीमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता

A 350-foot tricolor flag in Pandhari attracted attention; 8 thousand 500 students participated in the awareness rally | पंढरीत ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने वेधले लक्ष; जनजागृती रॅलीत ८ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पंढरीत ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने वेधले लक्ष; जनजागृती रॅलीत ८ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Next

- विठ्ठल खेळगी 
पंढरपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी पंढरपुरातून रॅली काढण्यात आली. ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधले. भारत मातेच्या जयघोषाने पंढरीनगरी दुमदुमली. या रॅलीमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता
रॅलीत ३५० फुटांचा तिरंगा ध्वज हातात घेऊन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  पंढरी नगरी झांज पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरात भारत माता की जय, वंदे मातरम यांनी दुमदुमून निघाली. शहरात विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीत सादर करीत पुष्पवृष्टी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, भादुले चौक, नाथ चौक, महाव्दार चौक, कालिका देवी चौक मार्गे येवून छत्रपती शिवाजी चौक येथे समारोप करण्यात आला.

Web Title: A 350-foot tricolor flag in Pandhari attracted attention; 8 thousand 500 students participated in the awareness rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.