१९ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ४७ वर्षाच्या रुग्णाला जीवनदान

By दिपक दुपारगुडे | Published: March 17, 2023 06:33 PM2023-03-17T18:33:53+5:302023-03-17T18:34:44+5:30

डॉक्टरांनी तो ब्रेनडेड झाल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे अवयवदान करण्याबाबत नातेवाईकांना समुपदेशन केले असता, त्यांनी ते मान्य केले.

A 47-year-old patient was given life thanks to a 19-year-old youth's organ donation | १९ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ४७ वर्षाच्या रुग्णाला जीवनदान

१९ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ४७ वर्षाच्या रुग्णाला जीवनदान

googlenewsNext

सोलापूर : अपघातग्रस्त तरुण लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बारामतीहून मित्रासोबत फलटणला जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्याला उपचारासाठी पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तो ब्रेनडेड झाल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे अवयवदान करण्याबाबत नातेवाईकांना समुपदेशन केले असता, त्यांनी ते मान्य केले.

याबाबत माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्याकडून अश्विनी सहकारी रुग्णालय येथील किडनी प्रत्यारोपण समुपदेशक यांना देण्यात आली. रुग्णालयात अवयवयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला किडनीच्या स्वरुपात जीवनदान मिळाले.

या प्रत्यारोपण प्रक्रियेत अश्विनी सहकारी रुग्णालयाचे प्रसिडेंट गंगाधर कुचन, चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण जोशी, डॉ.आनंदनारायण मालू, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विद्यानंद चव्हाण यांचा प्रत्यारोपण प्रक्रियेत सक्रीय सहभाग होता.

वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र घुली, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ मेरकर, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर, अतिरिक्त प्रशासकीय अधिकारी सचिन बिज्जरगी, अवयव प्रत्यारोपण समुपदेशक स्वरुपा केवलगी, उमेश शिवशरण ओटी विभागातील नर्सिंग स्टाफ, सीव्हीटीएस विभागातील नर्सिंग स्टाफ व अम्ब्युलन्स स्टाफ यांनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: A 47-year-old patient was given life thanks to a 19-year-old youth's organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.