जड वाहतुकीनं घेतला ९ वर्षाच्या बालकाचा बळी; मामाच्या गावी आलेल्या भाच्यावर काळाची झडप

By विलास जळकोटकर | Published: May 21, 2024 06:46 PM2024-05-21T18:46:45+5:302024-05-21T18:52:41+5:30

सोलापुरात मामाच्या गावी आलेल्या तेलंगणातील भाच्यावर काळाची झडप.

A 9-year-old child was killed by heavy traffic Time strikes the nephew who came to his uncle's village | जड वाहतुकीनं घेतला ९ वर्षाच्या बालकाचा बळी; मामाच्या गावी आलेल्या भाच्यावर काळाची झडप

जड वाहतुकीनं घेतला ९ वर्षाच्या बालकाचा बळी; मामाच्या गावी आलेल्या भाच्यावर काळाची झडप

सोलापूर : मामाकडे सोलापूरला सुट्टीसाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील नऊ वर्षाच्या चिमुकला डंपरखाली चिरडून ठार झाला. मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर रोडवर हा अपघात झाला. जड वाहतुकीचा आणखी एक बळी गेल्याचे समोर आले आहे. असद गौस शेख (वय- ९, रा. पद्मावती नगर, बोराबंडा, अकलापूर, जि. कुकाडपल्ली सध्या नागनाथ नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. यातील मयत बालक असद गौस शेख हा बालक तेलंगणा राज्यातील बोराबंडा, अकलापूर येथे राहतो. शाळेला सुट्टी असल्याने तो सोलापूरला आजोळी मामा व आजीकडे आलेला होता. 

सकाळी १०:३० च्या सुमारास तो मामासोबत मोटारसायकलीवरुन घरकूुलकडे जात होता. नागनाथ नगर, नई जिंदगी परिसरातील कच्च्या रस्त्यावरुन सुसाट वेगानं येणाऱ्या एम. एच. १३ डी क्यू ९१९६ हायवा डंबर वाहनानं पाठिमागून धडक दिली. यात मयत असद व मामा रोडवर पडले. भाच्चा असद हा हायवा वाहनाच्या पाठिमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. या घटनेची खबर एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच हवालदार एस. के. चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले. बेशुद्धावस्थेतील असद याला शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
 
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत गर्दी आटोक्यात आणून मयत बालकाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णायात पाठवले.
 
जड वाहतुकीचा बळी
नई जिंदगी नागनाथ नगर रस्ता कच्च्या स्वरुपाचा आहे, या मार्गावरुन जड वाहतुकला बंदी असतानाही वाहने बिनदिक्कत सुसाट वेगाने धावतात. यापूर्वीही शहर परिसरात जडवाहतुकीचे बळी गेले आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली.

Web Title: A 9-year-old child was killed by heavy traffic Time strikes the nephew who came to his uncle's village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.