पिकअपने समोरुन धडक दिल्यानं रोडवर पडून दुचाकीस्वार जखमी

By दिपक दुपारगुडे | Published: July 3, 2024 06:57 PM2024-07-03T18:57:00+5:302024-07-03T18:57:00+5:30

सोलापूर : घराकडे जात असलेल्या तरुणाला समोरुन सुसाट येणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडून जखमी झाला. बुधवारी ...

A biker fell on the road after being hit from the front by a pickup | पिकअपने समोरुन धडक दिल्यानं रोडवर पडून दुचाकीस्वार जखमी

पिकअपने समोरुन धडक दिल्यानं रोडवर पडून दुचाकीस्वार जखमी

सोलापूर : घराकडे जात असलेल्या तरुणाला समोरुन सुसाट येणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडून जखमी झाला. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मंद्रूपजवळील कोरे पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. अजय लक्ष्मण मरीआईवाले (वय- ३०, रा. मंद्रूप, ता. द. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.

यातील जखमी तरुण बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मंद्रूपजवळील कोरे पेट्रोलपंपावरुन घराकडे निघाला होता. समोरुन येणाऱ्या एम. एच. १३ सी यू ५८९१ या पिकअपने निष्काळजी पणे वान चालवल्याने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुण रोडवर पडून जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाला जखम झाली. मंद्रूप येथील सरकारी दवाखान्यात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला भाऊ मारुती यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 

Web Title: A biker fell on the road after being hit from the front by a pickup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात