हॉटेलमध्ये तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली!
By रवींद्र देशमुख | Updated: March 23, 2023 16:36 IST2023-03-23T16:35:15+5:302023-03-23T16:36:22+5:30
गुन्हा दाखल झाला आहे.

हॉटेलमध्ये तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली!
सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात अनोळखी तिघांनी बीअरची बॉटल फाेडून तरूणाला जखमी केले. यात कुणाल सुर्यकांत कसबे ( वय ३८, रा. मीरनगर, जुळे सोलापूर) हा तरूण जखमी झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
कसबे हा हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन एका टेबलवर बसला होता. तेव्हा तीन अनोळखी तरूण तेथे येऊन दुसरीकडे बस, असे म्हणाले. कसबे आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर डोक्यात बिअरची बाटली फोडून कसबेला जखमी केले. कसबेच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक शेळके करीत आहेत.