पंढरपूर स्थानकातील फलाटमध्ये बस घुसली; चार प्रवासी जखमी, एक महिला गंभीर
By रवींद्र देशमुख | Published: August 17, 2023 11:14 AM2023-08-17T11:14:16+5:302023-08-17T11:15:20+5:30
एस टी बस वरील बसचालक यांचे नियंत्रण सुटल्याने ती एसटी बस बसस्थानकामधील ९ व १० क्रमांकाच्या फलाटमध्ये शिरली.
पंढरपूर/सोलापूर : एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने नवीन बस स्थानकातील फलाटवरमध्ये एसटी बस शिरली आहे. यामुळे फलाटवर बसच्या प्रतीक्षेत बसलेले चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एक महिला गंभीर झाली आहे . ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.
राज्य परीवहन पंढरपूर आगाराची एम एच २० बी एल ४२१४ या क्रमांकाची विना वाहक एस टी बस पंढरपूरकडून सोलापूर नेहण्यासाठी शब्बीर नासीर नदाफ (वय ३७, रा. आंबेडकर नगर, गोपाळपूर नाक्याच्या पाठीमागे, पंढरपूर) घेऊन बस स्थानकावर घेऊन येत होते. मात्र त्या एस टी बस वरील बसचालक शब्बीर नासीर नदाफ यांचे नियंत्रण सुटल्याने ती एसटी बस बसस्थानकामधील ९ व १० क्रमांकाच्या फलाटमध्ये शिरली. यावेळी एस टी बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या चार प्रवाशांना धडक बसली आहे.
यामध्ये कमल विठ्ठल कुंभार ( वय ७२), पोपट जनार्धन गुटाळ (वय ६४), शालन पोपट गुटाळ ( वय ५५), सुप्रिया गणेश कुंभार ( वय ३०, रा. कुंभार गल्ली, भजन दास चौक, पंढरपूर) जखमी झाले आहेत. यामध्ये कमल विठ्ठल कुंभार यांचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एसटीबस चा ब्रेक फेल झाल्याने झाला असल्याचे नदाफ यांनी सांगितले.