बार्शी स्थानकातील वर्कशॉपमधून बस रिव्हर्स घेताना वाहकाला धडक, जागीच मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Published: April 16, 2024 05:48 PM2024-04-16T17:48:53+5:302024-04-16T17:52:14+5:30
ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास बस आगारातील वर्कशॉपमध्ये घडली. याबाबत बार्शी बस आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आकाश श्रीमंत नाईक (रा. दत्तनगर बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चालक संतोष कोरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : बसस्थानकाच्या वर्कशॉपमध्ये मेंटेनन्ससाठी रॅम्पवर लावलेली एसटी बस मागे घेत असताना ड्यूटीवर जाणारा वाहक सतीश नारायण इंगळे (वय ४२, रा. येडशी) यास धडक बसून चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास बस आगारातील वर्कशॉपमध्ये घडली. याबाबत बार्शी बस आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आकाश श्रीमंत नाईक (रा. दत्तनगर बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चालक संतोष कोरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाहक सतीश इंगळे हा सोमवारी रात्री बार्शी-सोलापूर ही बस घेऊन मुक्कामास जाणार होता. त्यासाठी तो वर्कशॉपमधील फिल्टरचे पाणी बाटलीमध्ये भरून आणण्यासाठी गेला. बाटली भरून तो वर्कशॉप समोरून बाहेर येत असताना चालक संतोष नागनाथ कोरे हा रॅम्पवरून एसटी बस (एमएच ०६ एस ८२७२) मागे घेत होता. तो मागील बाजूचा अंदाज न घेता वाहन काढत असताना मागून पायी जात असलेला वाहक सतीश इंगळे हा चिरडला आणि डोक्याला जबर मार लागून जागीच मरण पावला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुळीक करीत आहेत.