उळे जवळ दुभाजकाला धडकून कारचालकाचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: November 24, 2022 16:14 IST2022-11-24T16:14:09+5:302022-11-24T16:14:12+5:30
तानाजी हे आपल्या कारमधून सोलापूर हून तुळजापूर कडे जात होते.

उळे जवळ दुभाजकाला धडकून कारचालकाचा मृत्यू
सोलापूर : तुळजापूर कडे जाताना दुभाजकाला धडकल्याने कारचालकाचा मृत्यू झाला. तानाजी प्रल्हाद क्षीरसागर ( वय ५३, रा. पुणे ) असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी पहाटे उडघडकीस आली.
तानाजी हे आपल्या कारमधून सोलापूर हून तुळजापूर कडे जात होते. त्यावेळी उळे गावाच्या जवळ असलेल्या दुभाजकाला कार जाऊन धडकल्याने ते जखमी झाले. या धडकेनंतर ते कारच्या बाहेर येऊन पडले होते. त्यांच्या पोटास खरचटलेले होते. शिवाय त्यांच्या तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव येत असल्याने त्यांना १०३३ रूग्णवाहिकेतून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मुत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ही घटना गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.