अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करणाऱ्या १५ मद्यपी व २ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल
By Appasaheb.patil | Published: November 11, 2022 05:16 PM2022-11-11T17:16:28+5:302022-11-11T17:17:06+5:30
सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, अनिल चासकर विभागीय उप-आयुक्त, पुणे ...
सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, अनिल चासकर विभागीय उप-आयुक्त, पुणे यांचे आदेशान्वये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीच्या आधारे निरीक्षक अ विभाग यांनी विजापूर रोडवरील परिसरातील जलसा ढाबा येथे छापा टाकला असता सदर हॉटेलचे चालक यांचेसह त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या ७ मद्यपी नामे किशोर भूमकर, रोहीत पतंगे, विनायक चव्हाण, विनायक होटकर, स्वप्नील गायकवाड, दर्शन चव्हाण,कांतेप्पा चव्हाण व ढाबाचालक मंगेश होटकर यांस अटक करुन ताब्यात घेतले होते.
अटक आरोपींच्या ताब्यातून ९४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) (ब) व ८४ नुसार गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी १० नोव्हेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालक यास २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे असा एकूण ३९००० हजार दंड ठोठावला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद एस.ए. बिराजदार यांनी दिली असुन तपास निरिक्षक संभाजी फ़डतरे यांनी पूर्ण केला.
तर दुसरीकडे त्याचदिवशी निरीक्षक माळशिरस विभाग यांनी मंगळवेढा येथील मराठवाडा ढाबा येथे छापा टाकला असता सदर हॉटेलचे चालक यांचेसह त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या ८ मद्यपी नामे संजय जाधव, सचिन उन्हाळे, उत्तम भुसे, शंकर आसबे, योगेश फराटे, कानीफनाथ लोखंडे, लखन मंडलिक, गणेश मोरे व ढाबाचालक श्रीकांत लेंडवे यांस अटक करुन ताब्यात घेतले होते. अटक आरोपींच्या ताब्यातून १९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) (ब) व ८४ नुसार गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,मंगळवेढा यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालक यास २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे असा एकूण २९ हजार दंड ठोठावला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद रवी पवार यांनी दिली असुन तपास निरिक्षक संदीप कदम यांनी पूर्ण केला.
सदरची कारवाई निरीक्षक संभाजी फ़डतरे, संदीप कदम , सदानंद मस्करे, सुनिल कदम , दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सुनिल पाटील, सुरेश झगडे, कैलास छत्रे, सहायक दुय्यम निरीक्षक बिराजदार , रवी पवार, कोळेकर, मुकेश चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, नंदकूमार वेळापूरे, शोएब बेगमपूरे, तानाजी जाधव, मलंग तांबोळी, तानाजी काळे प्रियंका कुटे व वाहनचालक रशिद शेख, मारुती जडगे ,दिपक वाघमारे यांनी पार पाडली.