ॲपव्दारे महिलेच्या खात्यातून पैसे काढल्याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Published: June 18, 2023 03:37 PM2023-06-18T15:37:01+5:302023-06-18T15:37:35+5:30
ही घटना १० जून रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजण्याच्या दरम्यान विजय देशमुख नगर येथे घडली.
सोलापूर : ऑनलाइन ॲप द्वारे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती दास असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अपूर्वा संजय गायकवाड (वय २६, रा. विजय देशमुख नगर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० जून रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजण्याच्या दरम्यान विजय देशमुख नगर येथे घडली.
फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेचे प्लॅटिनम कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी आरोपी स्वाती दास हिने फोन करून अपूर्वा यांचा विश्वास संपादन करून बँकेचे मोबाईल ॲप सुरू करण्यास सांगितले. त्यात प्रोसेस करण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीला एक ओटीपी आला व त्यांनी तो ओटीपी दिल्यानंतर काही वेळाने अपूर्वा गायकवाड यांच्या क्रेडिट कार्डवरून ६३ हजार ८१७ रूपये कट झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला. याप्रकरणी त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.