धाब्यावर दारू पिणे पडले महागात; हॉटेलचालकासह दोन मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

By Appasaheb.patil | Published: September 1, 2023 05:36 PM2023-09-01T17:36:24+5:302023-09-01T17:36:46+5:30

ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A case has been registered against two drunkards along with the hotel manager in solapur | धाब्यावर दारू पिणे पडले महागात; हॉटेलचालकासह दोन मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

धाब्यावर दारू पिणे पडले महागात; हॉटेलचालकासह दोन मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

googlenewsNext

सोलापूर : हॉटेल, ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून सोलापूर शहर जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेल  रेणुका या ढाब्यावर टाकलेल्या धाडीत हॉटेल चालकासह २ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सविस्तर वृत्त असे की, गुरुवार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक सुनिल कदम यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जुना कुंभारी नाका हॉटेल रेणुका या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक शेखर अजनाळकर (वय ३५), हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याच्यासह २ मद्यपी ग्राहक श्रीकांत सायण्णा भंडारे व उमेश कल्लप्पा हावले यांना अटक करण्यात आली. ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एका दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र शुक्रवारी न्यायालयात सादर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकास २५ हजार रुपये दंड व दोन मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे, निरिक्षक सुनिल कदम, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, आण्णा कर्चे, नंदकुमार वेळापुरे, वाहन चालक दिपक वाघमारे यांच्या पथकाने पार पडली. शासनाच्या वतीने सरकारी वकील संतोष पाटील यांनी न्यायालयात समक्षपणे बाजू मांडली. कोर्ट ऑर्डर्ली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली.

Web Title: A case has been registered against two drunkards along with the hotel manager in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.