शाळेतून तास संपवून गावी निघालेल्या अल्पवयीन मुलिला छेडणाऱ्यावर गुन्हा
By काशिनाथ वाघमारे | Published: April 25, 2023 05:21 PM2023-04-25T17:21:18+5:302023-04-25T17:22:09+5:30
ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परांडा रोडवरील बायपास चौकात घडली. याबाबत संबंधीत मुलीने तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सोलापूर : बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेतील जादा तास संपवून सायकलवरून गावी निघाली असता, एकाने अडवून तिचा हात धरला आणि लग्न करू म्हणून छेडछाड केली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसात किरण येळे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परांडा रोडवरील बायपास चौकात घडली. याबाबत संबंधीत मुलीने तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित मुलगी दहावीत शिकत असून सध्या या शाळेत अतिरिक्त तास घेतले जात आहेत. ती सोमवारी सकाळी सायकलवरून शाळेला आली. सकाळी ११ वा. तास संपवून ती नेहमीप्रमाणे सायकलवरून तिच्या गावी निघाली होती. तो जवळ येऊन सायकल थांबवला. तिचा हात पकडून तू मला आवडतेस, लग्न करू, आई-वडीलाचा विचार करू नको म्हणाला. तिने मला शाळा शिकायची आहे .तू माझा पाठलाग करू नकोस, पोलीस स्टेशनला चल, गावी चल म्हणताच त्याने स्वारी...म्हणत तेथून पळ काढला. गावी घरी आल्यानंतर आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर दोघींनी तालुका पोलिस ठाणे गाठले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करत आहेत.