‘त्या’ विधानातल्या जंगलीऐवजी वेगळा शब्द टाकला अन् गुन्हा नोंदवला - जितेंद्र आव्हाड
By विलास जळकोटकर | Published: June 3, 2023 05:02 PM2023-06-03T17:02:16+5:302023-06-03T17:05:32+5:30
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना आपण ‘सौ जंगली कुत्ते शेर की शिकार नही करते’ असं विधान केलं होतं.
सोलापूर : सिंधी समाजाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्यावरुन गुन्हा दाखल झालेल्या वास्तवतेवर प्रकाश टाकताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यात त्या विधानातला जंगली शब्दाच्या ठिकाणी वेगळा शब्द टाकून क्लिप व्हायरल करण्याचं कारस्थान केल्याचा खुलासा केला.
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना आपण ‘सौ जंगली कुत्ते शेर की शिकार नही करते’ असं विधान केलं होतं. त्याचा गैरअर्थ काढून आपण वापरलेल्या त्या विधानातला जंगली शब्द बदलला गेला. आणि पोलिसांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता एका समाजाबद्दल नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आपण मूळ व्हिडिओही ट्विट केला. मात्र गुन्हा दाखल करताना पोलिसांनी कोणत्याची प्रकारची शहानिशा का केली नाही. आता जे गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा, अशी आपण पोलीस आयुक्तांना विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.