चालत्या मोटरसायकलवरून पडल्याने सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुतज्ञाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2023 17:19 IST2023-10-22T17:19:02+5:302023-10-22T17:19:11+5:30
आकाशवाणी केंद्राजवळ घटना: एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद

चालत्या मोटरसायकलवरून पडल्याने सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुतज्ञाचा मृत्यू
-संताजी शिंदे
सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील कारखान्यातून घराकडे जात असताना चालत्या मोटर सायकलचा अपघात होऊन, सोलापुरातील उद्योजक व प्रसिद्ध वास्तु तज्ञाचा मृत्यू झाला.
श्रीनिवास गोपाल येलदी (वय ५३, रा. बोल्ली मंगल कार्यालयजवळ, अशोक चौक, सोलापूर) असे वास्तु तज्ञाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्कलकोट एमआयडीसी परिसरातून श्रीनिवास येलदी घराकडे हे मोटारसायकल (क्र-एमएच-१३ डीएल-३६९६) वर घरी जात होते. ते आकाशवाणी केंद्र येथील पाटील पेट्रोलपंपा शेजारी गाडीवरून खाली पडले. त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होता.
उपचार सुरू असताना श्रीनिवास येलदी याचा मृत्यू झाला. याबाबत राजशेखर श्रीनिवास येलदी (वय २८) यांनी २२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पेालिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत. मयत श्रीनिवास येलदी हे विजयनगरातील प्रसिद्ध उद्योजक होते. ते शहरातील प्रसिध्द वास्तुतज्ज्ञ असल्याने त्याचा राज्यभरात सर्वत्र संपर्क होता.