वरवडे टोल नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: January 31, 2024 19:12 IST2024-01-31T19:12:15+5:302024-01-31T19:12:28+5:30
महादेव शामराव साळुंखे ( वय ५१, रा. तांदुळजा, लातूर) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

वरवडे टोल नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू
सोलापूर: पुणे सोलापूर महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत वरवडे टोल नाक्याजवळ हॉटेल यशवंत समोर रस्ता ओलांडणाऱ्या एका शेतकर्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रस्ता ओलांडणारा शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. महादेव शामराव साळुंखे ( वय ५१, रा. तांदुळजा, लातूर) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, त्याला मृत व्यक्तीस वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक तुळशीराम गायकवाड यांनी वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव महादेव शामराव साळुंखे (वय ५१, रा. तांदुळजा, लातूर) आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.