ज्वारी काढून घराकडे परतताना वाहनाच्या धडकेत शेतक-याचा मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Published: February 4, 2024 06:46 PM2024-02-04T18:46:43+5:302024-02-04T18:46:53+5:30

अपघातानंतर टेम्पो घटनास्थळी न थांबता चालक फरार झाला.

A farmer died in a vehicle collision while returning home after harvesting sorghum | ज्वारी काढून घराकडे परतताना वाहनाच्या धडकेत शेतक-याचा मृत्यू

ज्वारी काढून घराकडे परतताना वाहनाच्या धडकेत शेतक-याचा मृत्यू

काशिनाथ वाघमारे/सोलापूर: ज्वारी काढणीचे काम करून घराकडे परतत असताना वाहनाची जोराची धडक बसून जालीहाळ मधील शेतक-याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला.
शिवाजी कांबळे (वय ६०, रा. जालीहाळ) असे जागीच मरण पावलेल्या शेतक-याचे नाव असून हा अपघात रविवार, ४ फेब्रुवारी राेजी दुपारी २ वाजता झाला. याबाबत मुलगा नवनाथ कांबळे याने मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार सध्या दक्षिण भागातील अनेक गावात मजुरांना हाताला काम नसल्यामुळे रब्बी हंगामात मंगळवेढा शिवारात ज्वारी काढणीसाठी मजुरी मिळत असल्याने जावे लागत आहे. शिवाजी कांबळे व भारत व्हरगळ हे दोघे मंगळवेढा शिवारात ज्वारी काढणीचे काम संपवून दुपारी जालीहाळ येथे घराकडे दुचाकी (एम.एच. १४/ ए.यु.१७२९) वरून परतत होते. हिवरगाव-जालीहाळ रस्त्यावर विद्यानिकेतन विदयालयाजवळ हाजापूरकडून भाळवणीकडे निघालेल्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात भारत व्हरगळ हे गंभीर जखमी झाले तर शिवाजी कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. भारत व्हरगळ यास शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघातानंतर टेम्पो घटनास्थळी न थांबता चालक फरार झाला.

Web Title: A farmer died in a vehicle collision while returning home after harvesting sorghum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.