झाडाखाली झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 09:57 PM2023-07-03T21:57:10+5:302023-07-03T21:57:33+5:30

याबाबत मृताचा भाऊ प्रकाश नारायण कोकरे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

A farmer sleeping under a tree died of snakebite | झाडाखाली झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

झाडाखाली झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

googlenewsNext

 
सोलापूर  : घरासमोर लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या शेतक-यास सर्पदंश झाला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विकास नारायण कोकरे (वय ३८) असे मरण पावलेल्या शेतक-याचे नाव असून सोमवार, ३ जुलै रोजी पहाटे २ च्या सुमारास सांगोला तालुक्यात यलमर मंगेवाडी येथे ही घटना घडली.

याबाबत मृताचा भाऊ प्रकाश नारायण कोकरे यांनी पोलिसात खबर दिली आहे. मृत विकास कोकरे हे रविवारी रात्री स्वत:च्या घरासमोर लिंबाच्या झाडाखाली झोपले होते. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचे आई-वडील हे शेतात कापसाला पाणी देत होते. दरम्यान मानेवर काहीतरी चावल्याची जाणीव झाली. काही वेळानंतर त्यांना त्रास होऊ लागला. इतक्यात वडील नारायण कोकरे आले आणि दुसरा मुलगा प्रकाश यास बोलावून घेतले. त्यांनी उपचाराकरिता तत्काळ सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

Web Title: A farmer sleeping under a tree died of snakebite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.