रेल्वेतील फुकट्यांकडून तीन कोटींचा दंड वसूल 

By रूपेश हेळवे | Published: June 15, 2024 02:43 PM2024-06-15T14:43:52+5:302024-06-15T14:44:08+5:30

मे महिन्यात मध्य रेल्वेने अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांच्या ४.२९ लाख प्रकरणांमधून २८.४४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

A fine of Rs 3 Crores will be collected from the freemen in the railways  | रेल्वेतील फुकट्यांकडून तीन कोटींचा दंड वसूल 

रेल्वेतील फुकट्यांकडून तीन कोटींचा दंड वसूल 

सोलापूर : रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यात मध्य रेल्वेने एप्रिल ते मे महिन्यात २८.४४ कोटींचा दंड वसूल केला. सोलापूर विभागात ३ कोटींचा दंड वसूल केला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिला.

विना तिकीट प्रवासामुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान आणि प्रवासादरम्यान तिकीट काढून जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या. या तक्रारी वाढल्याने रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यात मे महिन्यात मध्य रेल्वेने अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांच्या ४.२९ लाख प्रकरणांमधून २८.४४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

Web Title: A fine of Rs 3 Crores will be collected from the freemen in the railways 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे