मंगळवेढ्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत ४१९ जणांकडून साडे तीन लाखांचा दंड वसूल

By काशिनाथ वाघमारे | Published: August 5, 2023 05:30 PM2023-08-05T17:30:46+5:302023-08-05T17:31:15+5:30

पाच जणांविरुद्ध खटले दाखल : १८ वर्षातील वाहन चालविणाऱ्या मुलांवरही नजर

A fine of three and a half lakhs was collected from 419 people in the action of the traffic police solapur | मंगळवेढ्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत ४१९ जणांकडून साडे तीन लाखांचा दंड वसूल

मंगळवेढ्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत ४१९ जणांकडून साडे तीन लाखांचा दंड वसूल

googlenewsNext

सोलापूर : वाहतूक शाखेच्या पोलीसांनी दुचाकी व चार चाकी वाहनांवर कारवाई करुन जुलै अखेर ३ लाख ३५ हजार १०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. दरम्यान अतिवेग आणि दारु पिवून वाहन चालविल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले. याप्रकरणात त्यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे.

वाहतूक शाखेच्या पोलीसांनी १ जुलै ते ३१ जुलै अखेर मोटर सायकलवर हेल्मेट न वापरणे, वाहनाला रिफ्लेक्टर नसणे, ट्रिपल सीट, नंबर प्लेट नसणे, फँसी नंबर, लायसन्स नसणे, सीट बेल्ट अशा ४१९ मोटर सायकलस्वारावर विविध स्वरुपात कारवाई करुन ३ लाख ३५ हजार १०० रुपये इतका दंड आकारला.

प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अधिकारी नयोमी साटम, डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी पांढरे, पोलीस शिपाई प्रवीण जाधव, सचिन काळेल यांच्या पथकाने ही कारवाई करुन दंड वसूल केला.

मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या पाच जणांना शिक्षा..
या दरम्यान दारु पिवून व अतिवेगाने वाहन चालविल्याप्रकरणी आणि रस्त्यावर वाहतूकीस अडथळा येईल अशा पध्दतीने वाहन उभे करणे अशा विविध कारणास्तव पाच खटले न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मोटर वाहन कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मंगळवेढा न्यायालयाने दारु पिवून वाहन चालविल्याप्रकरणी पाच मोटर सायकलस्वारांना शिक्षा सुनावली आहे.

Web Title: A fine of three and a half lakhs was collected from 419 people in the action of the traffic police solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.