आईशी किरकोळ भांडण झाल्यानं लेकीची गळफास घेऊन आत्महत्या
By विलास जळकोटकर | Updated: February 28, 2024 17:47 IST2024-02-28T17:47:08+5:302024-02-28T17:47:29+5:30
आईशी किरकोळ भांडणाचा निमित्त होऊन लेकीनं रागाच्या भरामध्ये पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

आईशी किरकोळ भांडण झाल्यानं लेकीची गळफास घेऊन आत्महत्या
विलास जळकोटकर, सोलापूर : आईशी किरकोळ भांडणाचा निमित्त होऊन लेकीनं रागाच्या भरामध्ये पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ९:३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे घडला. नंदिनी मनोज व्हनमाने (वय- १६) असे या मुलीचे नाव आहे.
यातील मयत मुलगी नंदिनीचे मंगळवारी रात्री ९:३० च्या सुमारास घरगुती कारणावरुन किरकोळ भांडण झाले. याचा ताण सहन न झाल्याने मुलगी नंदिनी घरातील वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये गेली. काही वेळानं तिनं गळफास घेतल्याचे घरच्या लोकांना समजले. आरडाओरडा झाल्याने सर्वजण जमले. खोलीतील पत्र्याच्या अँगलला तिने साडीच्या सहाय्यानं गळफास घेतल्यानं लटकत असल्याचे दिसून आले.
तातडीने नातेवाईकांच्या मदतीनं तिला खाली उतरवण्यात आले.रात्री ११:१० च्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली मात्र उपचारापूर्वीच मरण पावल्याचे जाहीर केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.