प्रजासत्ताक दिनी दानशूर भक्ताकडून पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणी ५० लाखाचं सोन्याचे घोंगडे गुप्तदान
By Appasaheb.patil | Published: January 26, 2024 02:58 PM2024-01-26T14:58:29+5:302024-01-26T14:59:46+5:30
सदर सोने वस्तू ८२० ग्रॅमची असून, त्याची अंदाजे किंमत ४९.५७ लक्ष होत आहे.
सोलापूर : आज प्रजासत्ताक दिन. पंढरपुरातील विठ्ठल -रुक्मिणी मातेच्या चरणी दानशुर भाविकाकडून ५० लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या घोंगडीचे गुप्तदान केल्याची माहिती व्यवस्थाक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, सदर सोने वस्तू ८२० ग्रॅमची असून, त्याची अंदाजे किंमत ४९.५७ लक्ष होत आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिरातील गाभाऱ्याला व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे मंदिरातील रुप मनमोहक बनलं आहे. दर्शनासाठी राज्यभरातून लोक आले आहेत, भाविक दर्शनानंतर विठ्ठलाला वेगवेगळ्या पद्धतीने दान करतात. मात्र आज भाविकाने केलेल्या दानामुळे मंदिर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.