बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकूलन चोपडीतील दुचाकीस्वार ठार

By काशिनाथ वाघमारे | Published: January 16, 2024 08:12 PM2024-01-16T20:12:17+5:302024-01-16T20:12:37+5:30

बेलवण नदीच्या पुलावर व्यायाम करणा-या व्यक्तीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली.

A motorcyclist from Chopdi was killed after hitting the bank of a bridge over Belwan river | बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकूलन चोपडीतील दुचाकीस्वार ठार

बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकूलन चोपडीतील दुचाकीस्वार ठार

सोलापूर : सांगोला तालुक्यात बेलवण नदीवरील पुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

नामदेव महादेव जवंजाळ (वय ५५, रा.चोपडी, ता. सांगोला) असे मृताचे नाव असून हा अपघात मंगळवार, १६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३५ वाजता नाझरे- नाझरेमठ रोडवर बेलवण नदीच्या पुलावर झाला. याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. साळुंखे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मृत नामदेव जवंजाळ हे मंगळवारी सकाळी चोपडी गावातून दुचाकीवरून नाझरेमार्गे नाझरे मठ येथे काही कामानिमित्त निघाले होते. बेलवण नदीच्या पुलावर व्यायाम करणा-या व्यक्तीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात जवंजाळ यांच्या डोक्याला मार लागल्याने भाऊ किसन जवंजाळ यांनी त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मुत्यू झाला.

Web Title: A motorcyclist from Chopdi was killed after hitting the bank of a bridge over Belwan river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.