खेळता खेळता गरम पाण्यात हात घातल्यानं दीड वर्षाचं बाळ भाजलं
By विलास जळकोटकर | Published: July 24, 2023 06:08 PM2023-07-24T18:08:33+5:302023-07-24T18:09:03+5:30
रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर : घरातील लहान मुलांकडे दूर्लक्ष झालं की, परिणाम भोगावे लागतात. सोलापुरमधील लष्कर भागात १५ महिन्याचे बाळ गरम पाण्यात हात घातल्याने भाजल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कर परिसरातील मोसीन तांबोळी यांच्या घरात ही घटना घडली. रविवारी रात्री कुटुंबातील सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. १५ महिन्याचा जॉन खेळत होता. जवळच गरम पाण्यानं भरलेलं पातेलं होतं. खेळता खेळता जॉननं या पाण्यात हात घातला. यानंतर तो मोठ्यानं रडू लागला. काही वेळातच हातावर फोड आले. यानंतर त्याला आजोबा सत्तार यांनी जवळच असलेल्या शासकीय रुग्णालात दाखल केले. यानंत त्याच्यावर सुरू करण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे.