स्वतःवर गोळी झाडून पोलीस अंमलदाराने केली आत्महत्या, भाऊबीजेच्या दिवशी धक्कादायक प्रकार!

By विलास जळकोटकर | Published: November 15, 2023 11:27 AM2023-11-15T11:27:54+5:302023-11-15T11:34:50+5:30

बुधवारी सकाळी सातच्या ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

A police officer committed suicide by shooting himself, a shocking incident on the day of Bhaubiji! | स्वतःवर गोळी झाडून पोलीस अंमलदाराने केली आत्महत्या, भाऊबीजेच्या दिवशी धक्कादायक प्रकार!

स्वतःवर गोळी झाडून पोलीस अंमलदाराने केली आत्महत्या, भाऊबीजेच्या दिवशी धक्कादायक प्रकार!

सोलापूर : सबंध सोलापूरकर भाऊ बीजेच्या दिवशी बहिणीला ओवाळणीच्या धामधुमीत असतानाच सोलापुरातील एका पोलीस अंमलदारानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी सातच्या ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

राहुल शिरसाट ( रा. केशवनगर पोलीस वसाहत सोलापूर) नेमणूक पोलीस मुख्यालय असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल चे नाव आहे.अज्ञात कारणावरून स्वतःवर गोळी झाडून पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास पोलीस करत आहे.

Web Title: A police officer committed suicide by shooting himself, a shocking incident on the day of Bhaubiji!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.