पोटच्या पोराने अंगावर हात उचलला; मुख्याध्यापक बापाची जगण्याची इच्छाच संपली, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:15 IST2025-04-02T15:14:58+5:302025-04-02T15:15:09+5:30

सौरभ याने मागील काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता.

a principal committed suicide after being beaten by his son | पोटच्या पोराने अंगावर हात उचलला; मुख्याध्यापक बापाची जगण्याची इच्छाच संपली, उचललं टोकाचं पाऊल

पोटच्या पोराने अंगावर हात उचलला; मुख्याध्यापक बापाची जगण्याची इच्छाच संपली, उचललं टोकाचं पाऊल

Solapur Suicide Case : "मला जॉब नाही, त्यामुळे काहीतरी उद्योगधंदा उभारून द्या," असे म्हणून एका हायस्कूलला मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने व मुलाच्या वारंवारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली आहे. ही घटना माढा तालुक्यातील लऊळ इथं घडली असून संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाळासाहेब पितांबर पाटील हे मयत झाले असून याबाबत निखिल पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सापटणे भोसे येथे राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ पाटील याने मला काही जॉब नाही, मला उद्योगधंदा करून द्या म्हणून वडिलांना शिवीगाळ करून भांडण करत मारहाणही केली. त्याच्या नेहमीच्या शिवीगाळ, मारहाणीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी लऊळ शिवारात ढोरे वस्तीजवळील रेल्वेला समोर गेले.
 
यामुळे ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास सौरभ याने प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीवर बी. एन. एस कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सौरभ पाटील याला पोलिसांनी अटक केली असून माढा न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी सारिका गटकूळ या करीत आहेत.

मुलाचे वैद्यकीय शिक्षणही अपूर्ण...
आरोपी मुलगा सौरभ याने मागील काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता. परंतु तेथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आलेला होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. 


 

Web Title: a principal committed suicide after being beaten by his son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.