पेट्रोल पंपाचा ऑफिसचा दरवाजा तोडून सव्वा लाख लंपास
By काशिनाथ वाघमारे | Updated: January 23, 2024 21:07 IST2024-01-23T21:07:11+5:302024-01-23T21:07:20+5:30
ही घटना २३ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडली.

पेट्रोल पंपाचा ऑफिसचा दरवाजा तोडून सव्वा लाख लंपास
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील सापटणे ( टे) हद्दीतील पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्याने ऑफिसचा दरवाजा तोडून सव्वा लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना २३ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडली.
सोलापूर-पुणे महामार्गावर सापटणे गावचा हद्दीत गजलक्ष्मी पंपाचा सीसीटीव्ही असलेल्या डीव्हीआरची वायरी तोडून ऑफिसच्या कपाटातील लॉकर तोडून त्यातील तीन दिवस पेट्रोल-डिझेल विक्री झालेले १ लाख २६ हजार ३१० रुपये ठेवलेले होते. पहाटे २:३० ते ४ वाजेदरम्यान घडली होती. मॅनेजर आकाश नाळे यांच्या लक्षात आल्याने मालक सुरेश वसंत नेहतराव यांना फोन वरून त्यांना माहिती दिली. मालक नेहतराव यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.