चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगारावर धाड; करमाळा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

By काशिनाथ वाघमारे | Published: May 9, 2023 03:06 PM2023-05-09T15:06:51+5:302023-05-09T15:07:12+5:30

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे.

A raid on a painted gambling house under a tamarind tree; Karmala police registered a case against five people | चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगारावर धाड; करमाळा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगारावर धाड; करमाळा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

सोलापूर:  घोटी येथे चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवार, ६ मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार ७०० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. 

परमेश्वर दशरथ बेडकुते (वय ५४, रा. वरकुटे), जालिंदर गोरख राऊत (वय ४५), दादा नाथा थोरात (वय ३६), दिलीप देवराव थोरात (वय ६०) व गोरख प्रभाकर राऊत (वय ५५, सर्व रा. घोटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे. यातील संशयित आरोपी वरकुटे-घोटी रस्त्याच्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली पत्ते खेळत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचले आणि संशयित आरोपीना घेराव घालून जागेवर पकडले.

Web Title: A raid on a painted gambling house under a tamarind tree; Karmala police registered a case against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.