शेळवेत शॉर्ट सर्किटने कृषी दुकान जळाले, आगीत ४० लाखांचे नुकसान
By काशिनाथ वाघमारे | Published: February 26, 2024 07:41 PM2024-02-26T19:41:14+5:302024-02-26T19:42:48+5:30
शेळवेत बरड वस्ती (ता. पंढरपूर) येथे शॉर्ट सर्कीटने एका ऍग्रो एजन्सीच्या कृषी दुकानास सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर : शेळवेत बरड वस्ती (ता. पंढरपूर) येथे शॉर्ट सर्कीटने एका ऍग्रो एजन्सीच्या कृषी दुकानास सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
पंकज रमेश गाजरे या नवउद्योजकाने सुरू केलेल्या या दुकानाला इलेक्ट्रिक वायरच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविला असून या आगीत खते, बी-बियाणे, किटकनाशके, जंतनाशके, बुरशीनाशके, संजीवके, औषधे, फर्निचर, रजिस्टर, बिल बुके, कुलर, लॅपटॉप असे सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
तहसीलदार लंगोटे यांच्या आदेशानंतर तलाठी बीटू कौलगे यांनी पंचनामा केला. दिवसभरात आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते. सायंकाळी उशीरा पंढरपूर ग्रामीण पोलिसात याची नोंद झाली.