एकच मिशन.. जुनी पेन्शन; सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज !
By दिपक दुपारगुडे | Published: March 16, 2023 03:52 PM2023-03-16T15:52:02+5:302023-03-16T15:53:00+5:30
पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली आदी सर्व सोयी सुविधा व सर्व कार्यालय सुरू होती. सर्व कार्यालयाचे कामकाज हे पूर्वत सुरू असल्याचे दिसून आले.
दिपक दुपारगुडे
सोलापूर : महानगरपालिकेचे काम नागरी सेवा सुविधा देण्याचे असल्याने नागरीकांची गैर सोय होऊ नये म्हणून संप न करता महापालिका कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच काळ्या फिती लावून कामकाज केले. यामुळे नागरिकांची गैरसोय टळली. केंद्रिय संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारपासून संप न करता काळी फीत लावून कामकाज करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी जाहीर केले होते.
सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीने आज केंद्रिय संघटनेने दिलेल्या आदेशानुसार जुनी पेन्शन लागू करणे व इतर मागण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपास महापालिका कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे. मात्र, महानगरपालिकेचे काम नागरी सेवा सुविधा देण्याचे असल्याने नागरीकांची गैर सोय होऊ नये यासाठी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी ही काळ्याफिथे लावून आज सकाळपासूनच कामकाजात सुरुवात केली अशी माहिती आरोग्य निरीक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिरसट यांनी दिली. यामुळे महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली आदी सर्व सोयी सुविधा व सर्व कार्यालय सुरू होती. सर्व कार्यालयाचे कामकाज हे पूर्वत सुरू असल्याचे दिसून आले.